Shikrapur Police Station

सणसवाडीत इमारतीत अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

इतर

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरुर येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर व्यक्तीला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावले होता. काही महिलांसह व्यक्तींनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अश्विनी शांतीलाल तांबे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजेंद्र पुंजाजी पगार, लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद, रामकृष्ण रामचंद्र गिरमकर, प्रवीण रावसाहेब ढवळे यांसह तीन अनोळखी जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सणसवाडी अश्विनी तांबे यांची इमारत एका डॉक्टरच्या ओळखीने राजेंद्र पगार यांना भाडे तत्वावर देण्यात आलेली होती.सदर इमारतीचा भाडे करारनामा केला असता आघाऊ रकमेचे चेक पगार यांनी तांबे यांना दिलेले होते. मात्र सदर चेक बँकेत भरल्यानंतर वटले नसल्याने पगार यांनी चेक परत द्या मी रोख रक्कम देतो असे म्हणून चेक परत घेतले. पण, रक्कम देण्यात टाळाटाळ करु लागल्याने तांबे यांनी राजेंद्र पगार यांना नोटीस पाठवत सदर इमारतीला काही दिवसांपूर्वी कुलूप लावले, त्यांनतर २१ जुलै रोजी अचानक काही महिला व व्यक्ती सदर इमारतीचे कुलूप तोडून आतमध्ये आल्याचे तांबे कुटुंबांना सीसीटीव्हीच्या नोटिफिकेशन द्वारे समजले.

त्यानंतर तात्काळ तांबे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि संबंधिताना विचारणा केली. शिवाय, तांबे यांनी तातडीने पोलिस मदत घेण्यासाठी पोलिस कंट्रोलरूम ला फोन केला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी जात तेथील महिला व इसमांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील तीन जण पळून गेले,

याबाबत अश्विनी शांतीलाल तांबे (वय ४५ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र पुंजाजी पगार (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे), लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद (दोघी रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे), रामकृष्ण रामचंद्र गिरमकर (रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे), प्रवीण रावसाहेब ढवळे (रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांसह तीन अनोळखी जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्त्तनवार हे करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकलेला फोटो शिरूर तालुक्यातील…

शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…

शिरूर शहरातून चारचाकी मारुती स्विफ्ट डिझायरची चोरी…

शिरूर तालुक्यात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….