snake

एक विषारी नागिण घेतेय ग्रामस्थांचा बदला…

देश महाराष्ट्र

लखनौ (उत्तर प्रदेश): हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातील नागरिक एका विषारी नागिणीमुळे दहशतीखाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या नागिणीने ५ जणांना दंश केला आहे. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांची प्रकती चिंताजनक आहे.

सदरपूर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार, गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका नागाला मारण्यात आले होते. याचा एक नागिण बदला घेताना दिसत आहे. या नागिणीने एका खोलीत झोपलेल्या आई, मुलगा आणि मुलीला दंश केला होता. त्यात या तिघांचाही मृत्यू झाला होता. दुसऱ्याच दिवशी या नागिणीने गावातील आणखी एक तरुण आणि महिलेला दंश केला. बेशुद्धावस्थेत या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचेही प्राण वाचले.

या नागिणीच्या भीतीमुळे सदरपूर गावातील नागरिकांची झोप उडाली आहे. सध्या वन विभागाच्या पथकांकडून सापाला पकडण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, ग्रामस्थांना शिकार बनवत असलेल्या सापाला वनविभागाने पकडले आहे. आता हा साप किती विषारी आहे. त्याचे वय काय आहे, याची पडताळणी वनविभागाकडून करण्यात येत आहे. वनविभागाने हा साप नागिण असल्याच्या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही. मात्र ग्रामस्थ हा साप नागिण असल्याचा दावा करत आहेत.

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

रीलसाठी मस्ती! 6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी अन्…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Viral News! कोब्राचे सूप बनवण्यासाठी केले तुकडे-तुकडे; पण चावलाच..

कोब्रासोबत मस्ती करतानाचा स्टंट तरुणाला पडला भारी…