मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

इतर

नाशिक: मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही साप आणि मुंगूसाचे व्हिडीओ पाहिले असतील. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही.

सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगूसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केली आहे. तसं पाहता साप आणि मुंगूसाचे युद्ध काही नवीन नाही. पण व्हायरल झालेला हा फोटो सध्या नेटकऱ्यांना भावूक करत आहे.

मुंगूस साप मारण्यात पटाईत असले तरी मुंगूसापासून आपला जीव वाचवण्यासाठी साप नवनवीन युक्त्या शोधत असतात. यामध्ये काही वेळा सापाचा जीव वाचतो तर काही वेळा त्याची शिकार होते. व्हायरल झालेल्या फोटोत एक साप झाडावर चढलेला दिसत आहे. त्याचवेळी एक मुंगूस या सापाची शिकार करण्यासाठी झाडाखाली उभा आहे. मुंगूसापासून आपला जीव वाचवण्यासाठी हा साप झाडाच्या फांदीवर चढलेला दिसत आहे. या सापाची शिकार करण्यासाठी मुंगूस देखील झाडाच्या आसपास चकरा मारताना दिसत आहे.

काही वेळ झाडाखाली चकरा मारल्यानंतर मुंगूसाची नजर या सापावर पडते. त्यातच झाडाच्या फांद्या लहान असल्याने मुंगूसाला सापाची शिकार करणं सोपं जाते. झाडाच्या फांदीवर साप लपत असल्याचं दिसताच मुंगूस अचानक उंच उडी घेतो आणि सापाला फांदीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, मुंगूसाच्या तोंडात फणा आल्यानंतरही साप प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. शेपटीने फांदी घट्ट पकडत तो कसाबसा या मुंगूसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. झाडावरुन खाली खेचल्यानंतर मुंगूस सापाला घेऊन पळून जातो. अंगावर काटा आणणारा हा थरार नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.