शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय युवतीसोबत गेल्या तीन वर्षांपासुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत वारंवार तिला मानसिक त्रास देत विनयभंग केल्याप्रकरणी सलीम पप्पु शेख (वय २१) रा.शिकापुर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी व आरोपी सलीम पप्पु शेख यांची मागील तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मागील एक वर्षापासून दोघेही फोनवर बोलत होते. ऑगस्ट २०२३ पासुन सलीम शेख हा युवतीचा वस्तीपर्यंत पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच वारंवार फोन करुन त्याच्यासोबत बोलण्यासाठी मानसिक त्रास दयायचा. पिडीत युवतीने मला तुझ्या सोबत बोलायचे नाही असे सांगितले होते. तरीही तो त्याच्याशी बोलण्यासाठी युवतीला विनंती करायचा.

 

सप्टेंबर २०२३ मध्ये पिडितेला घराच्या बाहेर बोलावून घेत ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’ असे बोलून त्याने युवतीच्या हाताला धरुन जवळ ओढत विनयभंग केला. त्यावेळी पिडिता घाबरली असल्याने तिने हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. सलीम शेख याच्या विषयी पिडीतेच्या आईला समजल्यावर त्यांनी सलीम शेख व त्याच्या वडिलांना बोलावले त्यावेळी त्याने पिडितेच्या आईची व तिची माफी मागीतली होती.

 

पिडितेची मार्च २०२४ मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर पिडिता पोलीस भरतीची तयारी करीत असुन तिने एका ॲकडमित प्रवेश घेतला आहे. ती सध्या पोलिस भरतीची तयारी करत असताना सलीम शेख याने त्याच्या मोबाईलवरून पिडितेला फोन करुन तु अकॅडमीमध्ये कशाला राहायला गेलीस, घरी परत ये नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी दिल्याने पिडीत युवती घाबरली.

 

त्यानंतर तिने संबधित प्रकार आईला सांगितला असता ऑगस्ट २०२३ ते दि २४ एप्रिल २०२४ या कालवधीत युवतीला सलीम पप्पु शेख याने माझे राहते घरापर्यंत पाठलाग करणे. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये मला घराच्या बाहेर बोलावून घेत ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझेसोबत लग्न करायचे आहे’ असे बोलत त्याने पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने सलीम शेख याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.