शिक्रापूरमधील दुचाकी अपघातातील तिसऱ्या युवकाचाही मृत्यू…

क्राईम

रक्षाबंधनच्या दिवशी घडलेला दोन दुचाकींचा भीषण अपघात

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे ११ ऑगस्ट त रक्षाबंधनच्या दिवशी दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा युवकांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी होता. पण, तिसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस नाईक राकेश मळेकर यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ सि टी ४००० या दुचाकीहून श्रीरामपूर येथे जात होता. शिक्रापूर येथे अहमदनगर बाजूने येणारी एम एच १२ एस टी ७४०४ हि दुचाकी रस्ता ओलांडत असताना हापसे यांच्या दुचाकीची समोरील दुचाकीला जोरदार धडक बसली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला होता.

नागरिकांनी तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग (दोघे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) या दोघांचा मृत्यू झाला होता. राजवर्धन सचिन हापसे (रा. श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता. पण, या अपघातातील तिसरा जखमी युवक राजवर्धन सचिन हापसे (रा. श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर हे करत आहेत.