शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे

 

पिंपरखेड येथील मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे हे शुक्रवारी संध्याकाळी शेतात मेंढ्यांचा कळप चारत होते. दिवसभराच्या कडक उष्णतेमुळे तहानलेल्या वीस शेळ्या तसेच मेंढ्या यावेळी शेजारील ऊसाच्या शेतातील सरीत साचलेले पाणी पिल्या. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत ९ शेळ्या व ५ मेंढ्यांना त्रास होऊन त्या गतप्राण झाल्या. मेंढपाळ कोकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांना तत्काळ बोलावून घेत इतर मेंढ्यावर उपचार केले. सदर शेळ्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू रासायनिक खत किंवा औषधाच्या दूषित पाण्यातून विषबाधा होऊन झाला आहे असे पिंपरखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांनी सांगितले.

 

दरम्यान मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडीतील मेंढपाळ महेश भाऊसाहेब शिंदे यांच्या ४ शेळ्यांचा शुक्रवारी (दि ३) अचानक मृत्यू झाला.कांद्याची पात खाल्ल्याने तसेच उष्णता वाढल्याने उष्माघाताने ही घटना घडल्याचे डॉ प्रकाश उचाळे यांनी सांगितले.

 

शिरुरचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉक्टर नितीन पवार यांच्या सुचनेनुसार दोन्हीही घटनांची नोंद घेत पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले आहे. मेंढपाळ अंकुश कोकरे मेंढपाळ शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

 

उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्या…

उन्हाळा कडक असल्यामुळें जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे प्रथम पाणी दुषित आहे का याची खात्री करुनच पाणी पाजले पाहिजे. तसेच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या-मेंढ्यांना चारु नये. तसेच दुपारच्या कडक उन्हात शेळ्या-मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवाव्यात असे आवाहन शिरुरचे पशुधन विकास अधिकारी ऋषिकेश जगताप यांनी केले आहे.

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना