कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या ऑफिसमधून दिवसाढवळ्या तब्बल ९० हजार रुपयांची किमतीची टूल्सबॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बबन नामदेव मिडगुले (वय ३७, रा. शिक्रापुर, वाबळेवाडी) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी मिडगुले हे जागृती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत आहेत. सदर कंपनीचे ऑफिस रांजणगाव MIDC परिसरातील फेसनेस काबी कंपनीच्या मागे आहे. दि २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे ते ऑफिसमध्ये आले. त्यांनी आपल्या सोबत आणलेली टूल्सबॅग ऑफिसच्या टेबलावर ठेवली आणि बाथरूमला जाण्यासाठी बाहेर गेले.
मात्र, दरवाजा बंद करण्यास विसरले. त्यानंतर सुमारे २० ते २५ मिनिटांनंतर ते ऑफिसमध्ये परतले असता, टेबलावर ठेवलेली टूल्सबॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र टूल्सबॅग कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत टूल्सबॅग लंपास केल्याची खात्री त्यांना झाली.
चोरीस गेलेल्या साधनात १ कॉर्डलेस हॅमर ड्रिल ड्रायव्हर, १ बॅटरी चार्जर, २ बॅटरी पॅक अशी अंदाजे ९० हजार रुपयांच्या टूल्सची चोरी झाली आहे. याबाबत रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार तेजेस रासकर हे करत आहेत.
रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?
रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन…पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?
रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले