विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित करत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असल्याची माहिती प्राचार्य संजीव मांढरे यांनी दिली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले होते. त्यापैकी आकाश संजू पवार २०६ गुण, युवराज संतोष वडघुले १९८ गुण, ज्ञानेश्वरी नितीन नरवडे १९८ गुण, सुदर्शन ज्ञानेश्वर कुंभार १९० गुण अशा प्रकारे 4 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असून मिळवत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे, पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट, रमेश जाधव, आदिनाथ गायकवाड, शिवाजी विधाटे, अनिता चव्हाण, धनाजी थोरात या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व शिरुरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.