शिरुर तालुक्यात टेम्पोच्या धडकेत महिला मृत्युमुखी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव-बाभुळसर रस्त्यावर कारेगाववरुन बाभुसकर खुर्द कडे भरधाव वेगाने जाण्याऱ्या टेम्पोची धडक बसल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात संतोष दत्तात्रय वाळके (वय ४१) (रा. बाभुळसर ता. शिरूर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असुन टेम्पो चालक भास्कर भागाजी पाडळे (रा. विघ्नहर्ता हॉस्पीटल शेजारी, मुळ रा. तर्डोबाची वाडी ता. शिरुर जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि १८) रोजी दुपारी 4:00 च्या सुमारास कारेगाव-बाभुळसर खुर्द रस्त्यावर अक्षदा भरत वाळके (वय 32) रा. बाभुळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे या स्वतःच्या दुचाकी क्रं एम एच 12 यु व्हि 9115 कारेगाववरुन बाभुसकरकडे चाललेल्या असताना टेम्पो क्रं एम एच 12 एल टी 3068 ने ओव्हरटेक करण्याच्या नादात पाठीमागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी अक्षदा वाळके या रस्त्यावर पडल्याने चाकाखाली जावुन त्यांच्या हात-पाय आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारपूर्वी मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.

 

रस्त्यावर असलेल्या अनधिकृत गतिरोधकामुळे मृत्यू…?

कारेगाव-बाभुससर सिमेंट रस्त्यावर कारेगाव ग्रामपंचायतने अनेक ठिकाणी अनधिकृत गतिरोधक बसवले असुन या गतिरोधकामुळेच अक्षदा वाळके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असल्याने येथे वारंवार किरकोळ अपघातही होत असतात.