रांजणगाव जवळ भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, नगर-पुणे हायवे रोडवरती एस. नाईन हॉटेल समोर अपघात झाला आहे. नगर-पुणे बाजुने जाणारी पिवळ्या रंगाची ईको कार क्र. MH 46 AH 0063 हिस विरुद्ध बाजूने नगर-पुणे रोडने येणारा कंटेनर क्र. HR 37 E7789 याने ठोकर देवून अपघात झाला आहे. सदर अपघातामधील कंटेनर चालकाने ईको कारला ठोकर देवुन रोडलगतच्या इलेक्ट्रील पोलला धडक दिली. सदर अपघातामध्ये ईकोकार मधील एकुण सहा जखमी झाले होते. जमलेल्या लोकांचे तसेच नाईट राऊंड मधील पोलीस स्टापच्या मदतीने बाहेर काढले. शिरूर व शिक्रापुर तसेच 108 रुग्णवाहिकेला फोन करुन घटनास्थळी येणे बाबत कळविले.

ईको कार मधील सहा व्यक्तींपैकी एक महिला, एक लहान मुलगा व एक लहान मुलगी गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णवाहिकेमधून शिरुर येथील रुग्णालयात पाठवुन दिले व इतर तीन गंभीर जखमींना दुस-या रुग्णवाहिकेमधून शिक्रापुर येथील रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर सदर अपघात ग्रस्त ईको कार मध्ये जखमींचा मिळून आलेल्या मोबाईल वरून जखमीचे नातेवाईक आदिनाथ देशमाने यांना संपर्क करुन अपघाता बाबत माहिती दिली व त्यांच्याकडून सदर ईको कार मधील व्यक्तींची नावे विचारली असता त्यांनी सदर स्कुलबस मध्ये त्यांचे नातेवाईक

1) संजय भाऊसाहेब म्हस्के वय 53 वर्षे (ईको कारचालक).

2) राम भाऊसाहेब म्हस्के वय 45 वर्षे,

3) सौ. साधना राम म्हस्के वय 35 वर्षे,

4) 4) कु. राजु राम म्हस्के वय 7 वर्ष

5) कु. हर्षदा राम म्हस्के वय 4 वर्षे व

6) कु. विशाल संजय म्हस्के वय 16 वर्ष, सर्व रा. आवाणे बुदुक, ता. शेवगाव, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.

कंटेनर चालक अपघात करुन अपघात घडले ठिणावरुन पळुन गेला आहे. वैद्यकिय अधिकारी यांनी जखमी कु.राजु राम म्हस्के वय 7 वर्षे व कु. हर्षदा राम म्हस्के वय 4 वर्षे है मयत झाले असल्याचे सांगुन साधना राम म्हस्के हि गंभीर जखमी असून तिच्यावर औषोधोपचार चालु असल्याचे सांगीतले. शिक्रापुर येथील जखमीबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफने चौकशी केली असता वैदयकिय अधिकारी यांनी जखमी संजय भाऊसाहेब म्हस्के वय 53 वर्षे, राम भाऊसाहेब म्हस्के वय 45 वर्षे व विशाल संजय म्हस्के वय 16 वर्षे, हे मयत झाले असल्याचे सांगीतले.

सदर अपघातामधील कंटेनर चालक याने त्याच्या ताब्यातील कंटेनर क्र. HR 377789 हा नगर-पुणे लेनवरून रॉग साईडने नगर बाजुकडे भरधाव वेगात चालवून अपघात होवुन मृत्यु होऊ शकतो याची जाणीव असतांनाही जाणीवपूर्वक रॉग साईडने, हायगयीने, निष्काळजीपणे, रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन त्याचे ताब्यातील कंटेनर चालवत आणुन नगर-पुणे रोडने पुणे बाजुकडे जाणारी ईको कार क्र. MH 4GAH 0063 हिस ठोस मारुन अपघात केला आहे. सदर अपघातामध्ये ईको कार मधील वरील पाच व्यक्तींच्या मृत्युस व एका व्यक्तीचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला आहे.

17/08/2022 रोजीचे रात्रौ 01.30 वा. चे सुास मौजे कारेगावचे हद्दीतील नगर पुणे रोडवरील हॉटेल “एस नाईन” समोर कंटेनर चालक (नाव, पत्ता माहित नाही) याने त्याचे ताब्यातील कंटेनर क्र. HR 37 E7789 हा नगर-पुणे लेनवरुन राँग साईडने नगर बाजुकडे भरधाव वेगात चालवुन अपघात होवुन मृत्यु होऊ शकतो याची जाणीव असतांनाही जाणीवपूर्वक राँग साईडने, हयगयीने, निष्काळजीपणे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवत आणुन नगर-पुणे रोडने पुणे बाजुकडे जाणारी ईको कार क्र. MH 46 AH 0063 हिस ठोस मारुन अपघात केला आहे.

सदर अपघातामध्ये ईको कार मधील 1) संजय भाऊसाहेब म्हस्के वय 53 वर्षे ( ईको कार चालक), 2) राम भाऊसाहेब म्हस्के वय 45 वर्षे, 3) कु. राजु राम म्हस्के वय 7 वर्षे, 4) कु. हर्षदा राम म्हस्के वय 4 वर्षे व 5) कु. विशाल संजय म्हस्के वय 16 वर्षे यांना गंभीर दुखापती करुन त्यांचे मृत्युस व 6) साधना राम म्हस्के वय 35 वर्षे सर्व रा. आवाणे बुद्रुक, ता. शेवगाव, जि. अहमदनगर हिचे गंभीर दुखापतीस व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. मकंटेनर क्र. HR 377789 या वरील चालकाचे विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.