…अन शिरुरकरांच्या काळजाचा ठोकाचं चुकला…पण ती दंगल नव्हे तर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) सकाळचे ठिक अकरा वाजलेले… अजुनही वातावरणात गारवा जाणवत होता…शिरुर शहराच्या गजबजलेल्या बसस्थानकाच्या आवारात अचानक काही जणांचा जमाव रस्त्यावर उतरुन रस्ता अडवतो…दोन गटात अपघातावरुन वाद होतो आणि हे दोन्ही गट आपआपसात भिडतात. एकमेकांवर दगड भिरकावतात. त्यानंतर काही क्षणातच पोलीसांचा ताफा सायरनचा आवाज करीत दाखल होतो. सुचना आणि अश्रुधूराचा वापर करीत पोलीस दंगल सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणतात. त्यानंतर जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले जाते आणि रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळित होते.

हे सर्व दृश्य पाहुन शिरुरकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला सर्वाना क्षणभर वाटले शिरुर शहरात उसळलेल्या दंगलीचेच हे चित्र आहे. हे खरे आहे की हे दंगल सदृश्य परिस्थितचे वर्णन आहे. पण खराखु-या दंगलीचे नाही तर शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हाताळण्याबाबत पोलीस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील हि रंगीत तालीम शिरुर बसस्थानकासमोर करण्यात आली.

 

यात पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलिस हवालदार अरुण उबाळे, उमेश भगत, पोलिस नाईक नाथा जगताप, बापू मांगडे, विशाल कोथळकर, तुकाराम गोरे, निलेश शिंदे, अशोक शिंदे, प्रताप टेंगले, विनोद मोरे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश नागलोत, विशाल पालवे, बंडू कोठे, भागवत गरकळ, प्रविण पिठले, शेखर झाडबुके, राजू मांगडे, अर्जन भालसिंग, महीला पोलीस अंमलदार तृत्पी माकर, प्रतिभा देशमुख, यांच्यासह गृहरक्षकदलाचे जवान आदीनी सहभाग घेतला.

 

दोन रुग्णवाहिकासह, आग विझविण्याचा बंब आदी यात सहभागी झाले होते. त्याखेरीज ठिकठिकाणी चेकपोस्ट नाके करुन तिथे पोलीस तैनात करण्यात आले होते. दंगल झालेल्या ठिकाणी पोलीस यांचे आगमन, रुग्णवाहिका अग्निशामक दल याचे दाखल होणे, जखमींना रुग्णालयात दाखल करणे, दंगेखोराना पकडुन पोलीस व्हॅन मधुन पोलीस स्टेशनला रवाना करणे, जमावाला काबूत आणण्यासाठी अश्रूधूरचा वापर याबाबतच्या तयारीची रंगीत तालीम यावेळी करण्यात आली.

 

यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले की, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन कोणीही बेकायदेशीर जमाव करुन भांडण तंटा केल्यास योग्य ती कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. कोरेगाव भिमा विजयस्तंभाच्या अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवू नये. शासकिय यंत्रणा यांच्यातील समन्वयातील तयारीची रंगीत तालीम आजच्या डेमोद्ववारे करण्यात आली.