शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून व्यक्तीला पाण्याच्या टाकीत टाकले अन…

क्राईम शिरूर तालुका

पाबळ मधील खळबळजनक घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे तेथे आला आणि गोठ्यात ठेवलेला पाण्याचा जग व ग्लास घेऊन जात असताना संतोष यांनी त्याला जग का घेऊन जातो जग नेऊ नकोस, असे म्हटले असता श्रीधर याने शिवीगाळ, दमदाटी करत संतोषला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.

दरम्यान संतोषने आरडाओरडा केल्याने श्रीधर याने संतोषला शेजारी असलेल्या जनावरांच्या पाण्याच्या टाकीत टाकले. यावेळी संतोषचा आरडाओरडा ऐकून शेजारील गणेश टेमकर सदर ठिकाणी आला त्याने संतोषला बाहेर काढले, तेव्हा तू माझ्या नादी लागला तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली.

याबाबत संतोष केरबा बगाटे (वय ४५) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रीधर वसंत बगाटे (वय २८) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नवनाथ नाईकडे हे करत आहे.