Crime

रांजणगाव MIDC त एका कंपनीतून दहा लाखांचे साहित्य चोरी

क्राईम

शिक्रापूर: रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये पाठीमागील भिंतीवरुन कंपनीमध्ये प्रवेश करत कंपनीच्या साहित्य ठेवलेल्या लॉकर मधून तब्बल १० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

unique international school
unique international school

रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे असलेल्या डॉंगकॉंग कंपनी मधील कामगार २६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील मशीन बंद करुन साहित्य लॉकर मध्ये ठेवून चावी मशीन जवळ ठेवून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी कामगार कंपनीत आले असता कंपनीतील मशीन वरील चावी लॉकरला लागलेली तसेच त्यातील साहित्य गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनी व्यवस्थापक व आदींनी पाहणी केली असता कंपनीतील पाठीमागील भिंतीवरून कोणीतरी आतमध्ये प्रवेश करुन मशीन जवळील चावी घेऊन लॉकर मध्ये ठेवलेले मशीनचे लहान मोठे साहित्य, कटर, लहान लहान महागड्या मशीन असा अंदाजे १० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत मंगेश नारायण देशमुख (वय ३८) रा. बाबुरावनगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. शिरसगाव देशमुख ता. खामगाव जि. बुलढाणा यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहे.