अभिमानस्पद; शिरुरच्या ओवी पवार हिने पिप साईट एअर रायफल प्रकारात मिळवले कांस्यपदक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या साऊथ झोन-२, सी बी एस ई शूटिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये कु.ओवी निलेश पवार (पोद्दार स्कुल, शिरुर) हिने ४०० पैकी ३९० गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळविले. त्यामुळे तिची आगामी काळात भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या सी बी एस ई नॅशनल शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडु अशा तब्बल सहा राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी निवड झालेली ओवी ही शिरुर मधील पहिलीच महीला नेमबाज बनली आहे. शिरुरमधील युनिक शुटिंग क्लब मध्ये शरद तरटे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे.

 

तिच्या या यशाबद्दल संदिप तरटे सर (आंतरराष्ट्रीय नेमबाज) तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्रिंसिपल निरज राय यांनी पुढील स्पर्धेसाठी ओवीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या