शिरुर तालुक्यातील सणसवाडीत दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन तेथील देशी विदेशी दारुच्या बाटल्या हप्त करत मयूर मधुकर कांबळे व अमोल नारायण हंबीर या दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.

सणसवाडी येथील हॉटेल दोस्ती बारच्या पाठीमागे दोन इसम बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस नाईक रवीकिरण जाधव यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना दोन इसम नागरिकांना दारुच्या बाटल्या विक्री करत असल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत तेथील दारुच्या बाटल्यांसह काही रोख रक्कम असा आठ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत पोलीस नाईक रवीकिरण मोहन जाधव (वय ३७) रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मयूर नारायण कांबळे (वय २७), अमोल नारायण हंबीर (वय ३०) दोघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.