ajit-pawar-shivajirao-adhalrao patil

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

मुख्य बातम्या राजकीय

मंचर (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरच्या उमेदवारीवरून चर्चा रंगली असतानाच आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचीच चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी आज मंचरमध्ये उपस्थित राहिले. शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार मंचरमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवार यांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

शिरुर लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. ते म्हणाले की, ‘राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेले नसते. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार (अमोल कोल्हे) भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो.’

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…