शिक्रापूरचे त्रेचाळीस विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत झळकले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित करत तब्बल 43 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवले असून एका विद्यार्थिनीची नवोदय परीक्षेस निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक रतन मंडलिक यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीचे १२० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले असताना त्यापैकी ९० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून विद्यार्थ्यांपैकी सानिका पवार, प्राची मांढरे, कार्तिक वाघमारे, श्रुती लांडे, तेजश्री सोनकांबळे, दीक्षा मराठे, वृषाली रहोदिया, रुद्रान्श अक्कर, वैष्णवी गोतावळे, प्रतीक कोळेकर, सोहम दरवडे, तेजस मांढरे, आदर्श माटूळकर, श्रेया भोसले, श्रीनिवास वाघोले, सार्थक गोंधे, पायल वाव्हळ, ज्ञानेश्वर घुले, सृष्टी सासवडे, निलेश सोळुंके, प्राजक्ता गोरे, पायल गंदगे, ओंकार गोफने, हर्ष जाधव, चैतन्य चव्हाण, सृष्टी चव्हाण, मृणाली नेमाडे, प्रमोद मेघवाल, तनुजा आगरकर, वेदिक भूंबे, रुद्र क्षीरसागर, सायली चाचणे, हर्षदा सोनवणे, पायल शिंगणे, आदित्य डाके, श्रावणी सनबे, स्वराज शेवते, समीक्षा गव्हानकर, विवेक जाधव, अमन गुप्ता, हर्ष ऱ्हाटोळ, शर्वरी पालखे, प्रथमेश जकाते या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवले. तर तेजश्री सोनकांबळे या विद्यार्थिनीची नवोदय प्रवेश परीक्षेस निवड झाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रतन मंडलिक, प्राजक्ता व्यवहारे, श्रीमती अलका शिंदे, शैला सोनवणे, ज्योती जकाते, प्रज्ञा रसाळ यांनी मार्गदर्शन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक रतन मंडलिक, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड, उपाध्यक्ष मिलिंद शिंदे यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.