शिरुरमध्ये मोबाईल चोरी प्रकरणी एस टी च्या चालक आणि वाहका विरोधात तक्रार

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर आगारात पुणे-औरंगाबाद हि एस टी थांबलेली असताना या गाडीतून प्रवास करणारा प्रवासी ATM मधुन पैसे काढण्यासाठी खाली उतरला. त्यावेळी त्याने आपला मोबाईल आणि पॉवर बँक शेजारीच असणाऱ्या एका मोबाईलच्या दुकानात चार्जिंगला लावली. परंतु तो प्रवासी परत आल्यावर पुणे-औरंगाबाद एस टी निघुन गेल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच सदर एस टी चालक आणि वाहकांनी त्याचा मोबाईल आणि पॉवर बँक त्या दुकानातून चोरुन नेल्याने या प्रवाशाने या दोघांच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव संजय देशमुख (वय २२) रा. शेवटचे घर,दत्तनगर,लाखाळा, वाशिम हे शुक्रवार (दि 30) रोजी पुणे येथुन वाशिमला जाण्यासाठी शिवाजीनगर एस टी आगारात पुणे-औरंगाबाद एस टी बस मध्ये बसले. हि एस टी बस शिरुर आगारात थांबली असताना एस टी कंडक्टरला टिकीटाचे पैसे देण्यासाठी वैभव देशमुख ATM मधुन पैसे काढण्यासाठी एस टी बस मधुन खाली उतरले आणि जवळच असलेल्या राकेश मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल आणि पॉवर बँक चार्जिंगला लावुन पैसे काढण्याकरीता ATM मध्ये गेले. परत आल्यानंतर त्यांना पुणे-औरंगाबाद एस टी आगारात दिसली नाही. तसेच सदर एस टी चालक आणि वाहक यांनी त्यांचा मोबाईल आणि पॉवर बँकही मोबाईल दुकानातुन चोरुन नेल्याचे समजल्याने या दोघांच्या विरोधात वैभव देशमुख यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी अनोळखी एस टी चालक आणि वाहक यांच्या विरोधात सुमारे 40 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नाथाभाऊ जगताप हे करत आहेत.