शिरुरमध्ये माऊली कटके यांच्याविरोधात नाराजीचा सुर…? सोशल मीडियापासून कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाची चर्चा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या राजकारणात सध्या आमदार माऊली कटके यांच्या अकार्यक्षमतेबाबत जोरदार चर्चा सुरु असून, सोशल मीडियावरील टिका आणि अनेक जवळच्याच कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असलेल्या असंतोषामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक न राहता स्थानिक नेतृत्वावरील विश्वासाचीही कसोटी ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर आमदार कटके यांच्या कामकाजाबाबत टिकात्मक पोस्ट आणि प्रतिक्रिया वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर, पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्येही खाजगीत नाराज असल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवरील न सुटलेले प्रश्न, विकासकामांचा मंदावलेला वेग, कार्यकर्त्यांशी विसंवाद आणि संघटनात्मक निर्णयप्रक्रिया यावरुन मतभेद असल्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरुर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. उमेदवारी वाटप, स्थानिक समीकरणे आणि नाराज गट यांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काहींच्या मते, या निवडणुकीत मतदार आणि कार्यकर्ते यांची भुमिका गुलदस्त्यात असल्यामुळे बाजार समितीच्या मतदानावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. 

पोस्टर अन रिलमध्येच दिसतात आमदार…?

आमदार कटके जनतेला फक्त फोटो, रिल्स मध्येच दिसतात. चासकमानच्या पाण्याचे ७० दिवसांचे रोटेशन असुनही टेलच्या शेतीला पाणी मिळू शकले नाही. त्यातच लोडशेडींगने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले पण आमदारांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते लोकांचे फोन पण उचलत नाही. लोकांच्या अडीअडचणी अन समस्यांचे त्यांना काहीच पडलेले नाही. अन महिनोमहिने ते शिरुर तालुक्यात फिरकत पण नाही. जनता दरबारासाठी न्हावरे, मांडवगण फराटा शिरूर चार पाच तास द्यायचे रिल्स बनवायच्या की परत तीन चार महिने तालुक्यातील जनतेकडे दुर्लक्ष करायचे त्यामुळे आमदार कटके हे फक्त रिल मधेच जनतेला दिसतात मात्र रियल मध्ये ते गायब असतात अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

नैराश्यातुन राजकीय मंडळीचे आरोप; माऊली कटके 

मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा चासकमानच्या टेलच्या सगळ्या भागात पाणी पोहचले आहे. परंतु काही राजकीय मंडळी हे फक्त नैराश्यातुन माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. काही मोकळ्या किटल्या नुसत्याच आवाज करत आहेत. तसेच गेल्या 25 वर्षात कोणत्याच आमदारांना जे काम जमलं नाही. ते चासकमानच्या अस्तरीकरणाचे काम चारी क्रं 1 ते 72 आणि चारी क्रं 72 ते 144 पर्यंत सर्व पुर्ण होणार असुन याबाबतचा सर्व पाठपुरावा मी केला आहे असेही आमदार माऊली कटके यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिंदोडीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत दाखवत सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा महसुल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?