क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

मुख्य बातम्या

शिरुर (किरण पिंगळे): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींनी शिकल पाहिजे यासाठी प्रसंगी समाजातील काही लोकांचा रोष पत्करुन मुलींना शिक्षण दिलं त्यामुळे आज स्रिया सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. जसं यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसंच सावित्रीमाईंच्या समाजकार्याला ज्योतिबांनी खंबीरपणे साथ दिली असे प्रतिपादन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले.

रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्था आणि रामलिंग महीला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि 3) रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन म्हणुन पोलिस निरीक्षक राऊत बोलत होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंजली माने यांना संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सुरेशकुमार राऊत, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून, दिपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका “कार्याध्यक्षपदी” तर उपसंपादक किरण पिंगळे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारी समितीच्या “अध्यक्षपदी” तसेच पत्रकार अर्जुन बढे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिरुर तालुका “प्रसिद्धीप्रमुख” पदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रामलिंग महिला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस कर्मचारी देशमाने, मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार, शिरुर ग्रामीण चे सरपंच नामदेव जाधव, उपसरपंच यशवंत कर्डिले, माजी सरपंच रामदास जामदार, रमेश चव्हाण, युवा उद्योजक शिवाजी दसगुडे, प्रकाश ठुबे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे, लता नाझीजकर, मीना गवारे, वैशाली बांगर, राणी शिंदे, डॉ वैशाली साखरे, छाया हारदे, उषा वेताळ, सालेहा शेख,ललिता पोळ, प्रिया बिरादार, नीलम शिरसागर, सतेजा भाभी, संध्या गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा उद्योजक शरद पवार यांनी तर आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.