मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ‘सुवर्ण’ भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ४५ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेडला नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. १०) स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड अंतर्गत […]

अधिक वाचा..

शिरूरचे नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना ‘उत्कृष्ट अधिकारी’ पुरस्कार

महसूल दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले महसूल नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील उल्लेखनीय व कार्यक्षम कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट अधिकारी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या […]

अधिक वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित

“हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे; डॉ. नीलम गोऱ्हे” जेजुरी: समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर […]

अधिक वाचा..
aamdabad-award

आमदाबाद येथे पार पडला गुणवंतांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नुकताच ‘आमदाबाद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदाबाद गावचा ज्या ज्या व्यक्तींनी गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला सन्मान देण्याचा प्रयत्न आमदाबाद ग्रामपंचायत तसेच आमदाबादच्या सरपंच अनिता घुले तसेच आमदाबाद गावचे माजी आदर्श सरपंच पोपट घुले यांच्या विशेष प्रेरणेतून आणि प्रयत्नातून पार पडला. […]

अधिक वाचा..

शिरूरचे डॉ. राजेंद्र दुगड यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ पुरस्कार प्रदान

अहमदाबाद येथे ज्योतिष महाकुंभ संमेलनात भव्य सन्मान शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याचे ज्योतिष शास्त्र व हस्तरेषा क्षेत्रातील नामांकित तज्ञ डॉ. राजेंद्र बाबूलाल दुगड यांना लाईफटाईम अचिव्हमेंट हस्तरेषा तज्ञ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय हस्तरेषा तज्ञ,ज्योतीष’ हस्तरेषा विद्वान गोल्ड मेडल अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित ‘ज्योतिष महाकुंभ मेळावा 2025’ या आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर 

तळेरे: बदलापूर येथून गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातील कलारत्न पुरस्कार 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रहाच्या चळवळीसाठी जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 18 एप्रिल रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या […]

अधिक वाचा..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई: मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, […]

अधिक वाचा..

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे

मुंबई: मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन […]

अधिक वाचा..