दोन वकीलांमार्फत ४० लाख देऊन सुद्धा डिल झाली फेल…

क्राईम मुख्य बातम्या

पुन्हा २० लाखाची मागणी करताच तक्रारदारालाच जेलमध्ये जायची आली वेळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही म्हणुन एका व्यक्तीने सरकारी कार्यालयात अर्ज करत खोटया तक्रारी करुन शिरुरमधील दोन नामांकीत वकीलांमार्फत तब्बल ४० लाख रुपये घेतले होते. परंतु त्यानंतरही पुन्हा तक्रारी न थांबवता २० लाखाची खंडणी मागितल्याने संबंधित ठेकेदार मधुकर भाऊसाहेब शिंदे (रा. सावेडी ,अहमदनगर) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सागर बंडू घोलप विरोधात खंडणी घेण्याच्या उद्देशाने त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जुलै २०२१ मध्ये तर्डोबाचीवाडी (ता. शिरुर) येथील मुक्ताईनगर परीसरातील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही. याबाबत सागर बंडु घोलप याने बांधकाम ठेकेदार मधुकर शिंदे यांच्या विरुद्ध सरकारी कार्यालयात अर्ज केला होता. तो अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदार शिंदे यांच्याकडुन शिरुरमधील दोन नामांकित वकिलांच्या मध्यस्तीने सागर बंडु घोलप याने परत अर्ज करणार नाही. याकरीता 40 लाख रुपये घेतले.

एवढी मोठी रक्कम घेऊनही सागर घोलप याने सदर बांधकाम व्यावसायिकाला त्रास देणे चालुच ठेवले. जुन 2023 मध्ये सागर घोलप याने पुन्हा बांधकामव्यावसायिक मधुकर शिंदे यांच्या विरुद्ध सरकारी कार्यालयात खोटे अर्ज करुन त्रास देणे सुरू केले. तसेच सदरचा अर्ज मागे घेण्याकरिता आणखी 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी मुक्ताईनगर येथे केली. ती रक्कम दिली नाही. तर त्यांच्याविरुद्ध सरकारी कार्यालयात आणखी अर्ज करुन साईडवर नोटीस लावुन बांधकाम व्यवसायात बदनामी करुन तर्डोबाचीवाडी येथील मुक्ताईनगरची साईड बंद पाडण्याची धमकी दिल्याने सागर बंडू घोलप याच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.