रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) सध्या भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून त्याचा थेट परिणाम शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. विशेषतः टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक, पालेभाज्या यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा परवडेनासा झाला आहे.
शेतीसाठी लागणारी औषधे, बी-बियाणे, मजुरी, पाणी आणि वाहतूक खर्च यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत होते. आता बाजारभाव कोसळल्यामुळे त्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांना मजुरही वेळेवर मिळत नाहीत, परिणामी शेतीची कामे रखडत आहेत.
याबाबत बोलताना शेतकरी म्हणाले, “शेती टिकवायची असेल, तर सरकारने बाजारभावावर नियंत्रण ठेवले पाहिजे. सध्याच्या स्थितीत आमच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. जर असेच चालु राहिले, तर शेती पडीक ठेवण्याची वेळ येईल.”
तसेच स्थानिक बाजार समितीकडूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. काही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी त्यांची जोरदार मागणी आहे.
Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप
शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
Video; शिक्रापुर येथे टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक; चालक फरार