शिरुर तालुक्यातील त्या निर्मार्त्यांचा बलोच चित्रपट होतोय प्रदर्शित

महाराष्ट्र शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 1 सामान्य पेंटींग कलाकार ज्ञानेश गायकवाड आणि गणेश खरपुडे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील दोघे जिवलग मित्र असून सामान्य शिक्रापूरकर म्हणून असलेली दोघांची ओळख आता बलोच या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते म्हणून झाली असून या त्यांच्या पहिल्याच व्यावसायिक चित्रपट निर्मिती पावलांचे कौतुक नुकतेच शिक्रापूरकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून बोलावून केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दोघा मित्रांनी पानिपतच्या युद्धानंतर बलुचिस्तानातील मराठा शुरविरांची होरपळ याचे भयाण वास्तव या चिञपटात दाखवले आहे. या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तामध्ये गुलामगिरी पत्कारावी लागली होती.

पनिपतची लढाई जरी मराठ्यांसाठी पराभव असला तरी यामध्ये धगधगता इतिहास या रूपाने मांडला आहे तो या चित्रपटकथेचे लेखक प्रकाश जनार्दन पवार यांनी केले तर या कथेवर चित्रपटाचा प्रस्ताव देखील त्यांनी केला याच निमित्ताने नाट्य क्षेत्रात सध्या कार्यरत असलेले ज्ञानेश गायकवाड, गणेश खरपुडे व कोकणातल्या किर्ती वराडकर आदींसह 11 समविचारी मित्र एकत्र आले व त्यांनी सदर चित्रपट दोन वर्षांपूर्वी बनवायला घेतला.

चित्रपटामध्ये प्रविण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर अशा दिग्गज कलाकारांची फौज उतरलेली असून कोविड काळात निधन झालेले जेष्ठ संगीतकार नरेंद्र भिडे यांनी यातील तिनही गाणी श्रेया घोषाल, कैलाश खेर, अवधूत गुप्ते यांचेसाठी बनवून ठेवली. मात्र त्यांच्या पश्चात ही गाणी ध्वनिमुद्रीत केल्याचे निर्माते ज्ञानेश गायकवाड यांनी सांगितले.

मोठे व्यावसायिक आणि चित्रपट म्हणून पाऊल टाकल्याने या दोघांच्या धाडसाचे संपूर्ण शिरुर तालुक्यातून कौतुक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून संपूर्ण टिमला साताऱ्यात बोलाविले व संपूर्ण कथानकावर चर्चा करुन सन्मानित केल्याचे देखील ज्ञानेश गायकवाड यांनी सांगितले.