अवधूत ज्वेलर्समध्ये सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील ‘अवधूत ज्वेलर्स’ या सराफा दुकानात दोन अज्ञात महिला चोरट्यांनी ग्राहक असल्याचा बनाव करून तब्बल 32,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना 3 मे रोजी सायंकाळी 4.30 ते 4.45 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल कचरू दहिवाळ (वय 34, व्यवसाय सराफ, रा. फ्लॅट नं. 23, सैनिकनगर सोसायटी, गोल राऊंडजवळ, दौंड, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चोरट्या महिलांनी खरेदीचा बहाणा करत त्यांच्याकडे व त्यांच्या भावाकडे (योगेश) सोन्याचे दागिने दाखवण्याची विनंती केली. याच दरम्यान त्यांनी 4 ग्रॅम 200 मिली वजनाच्या ‘कलकत्ती ए रिंग’ प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या चोरी करून चोरट्या पसार झाल्या.

या चोरीची किंमत अंदाजे 32,000 रुपये इतकी असून पोलिसांनी अज्ञात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कदम हे करीत आहे.शिरूर शहरासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुकानांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत ठेवण्याचा सल्ला शिरूर पोलिसांनी दिला आहे.