वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. सायंकाळी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी आनंद लुटला.
शनिवारी (ता. ८) सकाळी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून आलेल्या पहिलवानांनी सहभाग नोंदवला. आनंदराव सोनवणे, राजेंद्र भोसले, सुहास काटे यांनी पहिलवानांच्या कुस्त्या लावल्या. कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ‘चंद्रकला’ या मराठी व हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आर्केस्ट्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला.
वाघाळे गावामध्ये यात्रेनिमित्त अनेक हॉटेलधारकांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध झाले होते. महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवस मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. रांजणगाव एमआयडीसीच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
वाघाळे गावची यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वाघाळे, कालिका माता यात्रा कमिटी वाघाळे यांचे योगदान लाभले. यावेळी लहुशेठ थोरात, संचालक खरेदी-विक्री संघ शिरूर, राजेंद्र भोसले मा. उपसरपंच, अमोल धरणे मा. सरपंच, राजेंद्र धायबर ग्रामपंचायत सदस्य, सुहास काटे अध्यक्ष शेतकरी संघटना, आनंदराव सोनवणे मा. चेरमन. जयेंद्रकुमार सोनवणे, ओंकार थोरात अध्यक्ष कलासागर प्रतिष्ठाण, बाळासाहेब शेळके, विशाल शेळके, अमित सोनवणे, दिगंबर बढे, संदीप शेळके, किसनराव गोरडे वाल्मिक गावडे, गजानन थोरात, बाळासाहेब सोनवणे, दिलीप थोरात, संदीप धायबर, शरद धायबर, संतोष गोरडे, गौतम कारकूड आदी मान्यवर उपस्थित होते.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!