पोलिस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी आरोपिंच्या पोलिस कोठडीत वाढ

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांची बहीण मनिषा इथापे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दिली असल्याने पोलिसांनी या तिघांना अटक केली होती.

पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे हे पुणे ग्रामीण पोलिस दलात शिक्रापूर येथे नेमणूकीस होते. परंतु जितेंद्र यांचा शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या पत्नीसह, सासरा व मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे या घटनेचा पुढील तपास करत असुन या तिन्ही आरोपिंना(दि 21) मार्च रोजी अटक करुन त्यांना 22 तारखेला शिरुर न्यायालयात हजर केलं असता त्यांना (दि 24) मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना परत (दि 24) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना परत (दि 25) मार्च पर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी विनोद शिंदे यांनी दिली.