RANJANGAON

कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनीतील चोरी प्रकरणी सिक्युरीटीसह दोन आरोपी अटक

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड कंपनीतील 98 हजार 960 रुपयांच्या डाय चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत चोरी करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 9) ऑगस्ट रोजी रांजणगाव MIDC मधील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड या कंपनीतील 98 हजार 960 रुपये किंमतीचे डाय नं. 1272 चे 271 नग, डाय नं. 1558 चे 1465 नग, डाय नं. 1620 चे 738 नग असे एकुण 2,474 नग लोखंडी कट ब्लेड आणि फोर्डींग जॉब कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार यांच्यासह घटनास्थळी भेट देवुन माहिती घेतली. त्यावेळी सदरचा गुन्हा तीन महिन्यांपूर्वी घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथकाने या तीन महिन्याच्या
कालावधीतील कंपनीतील सीसीटिव्हि फुटेज प्राप्त करुन दररोज त्या फुटेजची पडताळणी करण्याचे काम चालु केले. या फुटेजच्या आधारे एक महिंद्रा पिकअप गाडीच्या संशयित हालचाली कंपनीच्या आवारात दिसुन आल्याने तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवत महत्त्वपूर्ण गोपनीय माहीती गोळा केली.

या गोपनिय माहितीच्या आधारे कंपनीतील सिक्युरीटी 1 ) गजानन हनुमंत दामले सध्या (रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. पेठवडज, ता. कंधार, जि. नांदेड) यास ताब्यात घेवुन तपास केला असता. हा चोरी केलेला माल महेंद्रा पिकअप मधुन अमरनाथ विष्णुदेव यादव सध्या (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. गोविंदपुर, उत्तर प्रदेश) याच्याशी सिक्युरीटी गजाजन दामले याने संगणमत करुन चोरला असल्याचे सांगीतले. आरोपी अमरनाथ यादव हा उत्तर प्रदेश येथे पळुन जाण्याच्या तयारीमध्ये असतांना त्यास परतुर, जि. जालना येथे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल सुनिल होंडे, अमोल गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी गजानन दामले यास (दि 19 ऑगस्ट) तर अमरनाथ यादव यास (दि 20 ऑगस्ट) रोजी पोलिसांनी अटक केली असुन या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, पोलिस नाईक राजेंद्र ढगे यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास राजेंद्र ढगे हे करत आहेत.