धामारी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ‘पुढचं पाऊल’ या मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन

शिरूर तालुका

शिक्रापुर (सुनिल जिते) अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माजी आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त (दि 24) धामारी (ता. शिरुर) येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीयअध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतुन बनवलेली मराठ्यांसाठी मार्गदर्शक असणारी ‘पुढचं पाऊल’ या पुस्तिकेचं प्रकाशन करुन सर्व उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षा शैलजा दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे, सरचिटणीस भास्कर पुंडे, शिरुर तालुका युवक अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका महिला सरचिटणीस धनश्री धुमाळ, धामारी गावचे सरपंच अर्जुन भगत, उपसरपंच संपत कापरे चेअरमन नवनाथ डफळ, सचिन डफळ, बबन डफळ, सुरेश गायकवाड, सुदाम डफळ, शिवाजी पावसे, माधवराव डफळ, आनंदराव निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा महासंघाच्या कामाविषयी माहिती देत उपस्थितांना ‘पुढचं पाऊल’ या पुस्तकाचं वितरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षा अर्चना सुभाष डफळ यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ डफळ यांनी केले. तर आभार अविनाश डफळ यांनी मानले.