न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर-चौफुला रस्त्यावरील आंधळगाव येथे दि ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२:५० च्या सुमारास झालेल्या भीषण वाहन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मयत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिपक सखाराम सोनवणे (वय ३५), रा. राजापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असुन यश बाळासाहेब नाईकवाडी (रा. राधाअकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश हा हुंडाई कंपनीची एम एच ११ सी क्यू ७०५० हि कार चालवत असताना गाडीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने गाडी बाजूला घेत असताना कार रस्त्याच्या खाली जाऊन जोराने आपटली.
या अपघातात गाडीत प्रवास करणारे बाळासाहेब रामभाऊ नाईकवाडी (वय ५६, रा. राधाअकोले) हे बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वाहनाचेही नुकसान झाले असून शिरुर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायदा कलला अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार संपत खबाले हे करत आहेत.
शिक्रापुर मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला चार जणांकडुन बेदम मारहाण
रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक
शिरसगाव काटा येथे घरफोडी; सुमारे २ लाख २० हजारांचे दागिने चोरीला