अपंगात्वावर मात करत ‘ते’ सांभाळतात महसुल विभागाचा महत्वाचा कारभार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): लहानपणीच आलेले अपगंत्व पण काहीतरी करून दाखवायचेच या प्रबळ इच्छेमुळे अफाट इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपगांत्वावर मात करत शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षापासून महत्वाच्या विभागात निलेश खोडसकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. अतिशय उत्कृष्ठरीत्या कामकाज करत असल्याने नुकतेच त्यांना महसुलदिनाच्या निमित्त औचित्य साधून प्रांतआधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्या हस्ते गौरव चिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

खोडसकर हे मुळचे नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कंधार गावचे रही वाशी असून शासकीय नोकरी निमित्ताने त्यांना शिरुर तहसिल कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुरवठा अव्वल कारकून म्हणूण ७ वर्ष कामकाज पाहीले. आता इंदिरा गांधी योजना अव्वल कारकूनाचा मुळ पदभार साभांळत असून त्याचबरोबर अतिरीक्त सेतू, कुळ कायदा अव्वल कारकून, कुळकायदा हिशोबी अव्वल कारकून, वतन इ. पदभार ते व्यवस्थित रीत्या साभांळत असून आदर्शवत कामकाज करत आहे. इतर अपंग व्यक्तींसाठी ते एक आदर्श व्यक्तीमत्व असून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण आकाशालाही गवसणी घालू शकतो याचे ते मुर्तिमंत उदाहरण आहे.