railway

मोठी बातमी! पुणे-नगर रेल्वेमुळे प्रवाशांचा वाचणार वेळ; पाहा रेल्वे स्थानकं…

महाराष्ट्र मुख्य बातम्या

मुंबईः पुणे आणि अहिल्यानगर यांच्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या थेट रेल्वेमार्गाच्या प्रकल्प अहवालाला आता अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर केला असून, या मार्गामुळे पुणे-नगर दरम्यानचा प्रवास सुमारे ३८ किलोमीटरने कमी होणार आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली.

पुणे शहरातून नगरला प्रवास करण्यासाठी दौंडमार्गे रेल्वे मार्ग वापरला जातो, जो सुमारे १५४ किलोमीटर लांबीचा आहे. नवा मार्ग तयार झाल्यास हे अंतर सुमारे ११६ किलोमीटरवर येणार असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. प्रस्तावित मार्गावर पुणे, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव, शिरूर, सुपा, चास, केडगाव आणि नगर अशी एकूण ११ स्थानके असतील. हा मार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर महामार्गाला समांतर जाणार असून, परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागाचा रेल्वे कनेक्टिव्हिटीशी अधिक चांगला संपर्क साधण्यास मदत होणार आहे. एकूण अंदाजित खर्च ११ हजार कोटी रुपये असून, प्रकल्प पूर्णत्वास आल्यास पुणे व नगरमधील सामाजिक-आर्थिक संबंध आणखी मजबूत होतील.

पुणे-नगर थेट रेल्वेमार्गाची मागणी कधीचीच प्रलंबित होती. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे विभागाने याचे सर्वेक्षण पूर्ण करून डीपीआर सादर केला असून, आता केवळ रेल्वे बोर्डाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून निधीची तरतूद, तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्गाच्या साकारतेने पुणे आणि नगरमधील शैक्षणिक, औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्राला नवा बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…