शिरुर तालुक्यात तब्बल ८० गावांचे गावठाण मोजण्याचे ड्रोनद्वारे काम पूर्ण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर भुमि अभिलेख कार्यालयाची कामगिरी…

 

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामविकास विभाग सर्वे ऑफ इंडिया व भूमि अभिलेख विभागामार्फत शिरुर तालुक्यातील ८० गावांचे गावठाण ड्रोन फ्लॉईगचे काम पूर्ण झाले आहे. पारंपारिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात, कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी कामात पारदर्शकता व अचूकता आणण्यासाठी ड्रोन मोजणीद्वारे 3D इमेज प्राप्त होत असल्यामुळे विविध विकास यंत्रणा, विभागांना नियोजन करताना सुलभता येत आहे.

 

पहिल्या टप्यातील चौकशी कामासाठी दि २८ व२९ ऑगस्ट रोजी ढोकसांगवी, निमगांव भोगी, जातेगाव बु, जातेगाव खुर्द, भांबर्डे, करंजावणे, पारोडी, दहिवडी, फाकटे, वडनेर खुर्द, दरेकरवाडी, धानोरी, आरणगाव, शिवतक्रार महाळुंगी, कुरुळी, कोहकडेवाडी, कोढापुरी, पिंपळे जगताप, नागरगाव, आंधळगाव, टाकळी-भिमा, विठ्ठलवाडी, चिंचोली, आपटी, गणेगाव खालसा, पिंपळे, कोळगाव डोळस, डोंगरगाव अशा २८ गावांची चौकशीची कामे करण्यात येणार आहे.

 

याबाबत गटविकास अधिकारी शिरुर, उपअधिक्षक भूमि अभिलेख, शिरुर यांनी सर्व ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, सरपंच व सदस्य यांची (दि २२) ऑगस्ट रोजीच्या आढावा बैठकीत ड्रोन सर्वे मोजणीचे होणारे फायदे समजावून सांगण्यात आले. ड्रोन सर्वे मोजणीमुळे प्रत्येक धारकांचे जागेचा मिळकतीचा नकाशा तयार होईल. तसेच सीमा निश्चित होतील व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल. प्रत्येक धारकाला आपल्या मिळकतीच्या मालकी हक्क संबंधी मिळकतपत्रिका व सनद मिळेल. गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेस शेतीचे सातबारा प्रमाणे धारकाचे मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्वा मान्यता आहे. मिळकत पत्रिका आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामीनदार म्हणून राहता येईल, विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.

 

तसेच बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्यक आहे. सीमा माहित असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतीचे संरक्षण करता येईल. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दी बाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यात गावठाण भूमापन नकाशा व अभिलेखांचा उपयोग होईल. तसेच मिळकती संबंधी बाजारपेठेमध्ये तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल .अशी माहीती शिस्त भुमि अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अमोल भोसले यांनी दिली आहे.