मंगलदास बांदल अखेर उतरले मैदानात…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारागृहातून बाहेर येताच तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पुणे जिल्ह्यातील राजकारणातील बडे नेते मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर तब्बल फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर २६ मे २०२१ रोजी अटक झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी मंगलदास बांदल यांची कारागृहातून सुटका झाल्याने त्यांच्या सुटकेचे अनेक ठिकाणी स्वागत झाले असता आता कारागृहातून बाहेर येताच मंगलदास बांदल मैदानात उतरले असून आता बांदल कोणता झेंडा खांद्यावर घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मागील बावीस महिने बांदल कारागृहात होते. बांदल यांना उच्च न्यायालयाने १८ जानेवारी रोजी जमीन मंजूर केला त्यांनतर कायदेशीर बाबींची पूर्तता करत बांदल नुकतेच १७ फेब्रुवारी रोजी कारागृहाबाहेर आले. बांदल बाहेर येताच ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले, तर बांदल यांच्या निवास्थानी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली असता आपल्याबाबत काही नेत्यांनी घटनाक्रम घडवून आणल्याने आपल्याला जेलमध्ये जावे लागले.

मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने आपण जेलमध्ये गेलोच नसल्याचे जाणवत असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांदल यांनी खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील वाळकेश्वराचे सहकुटुंब दर्शन घेत येथील बैलगाडा घाटात हजेरी लावून जोरदार भाषण देखील केले, तर बांदल यांच्या भाषणाला उपस्थित प्रेक्षक व ग्रामस्थांनी देखील मोठी दाद दिली तर एवढ्या मोठ्या प्रमाणातील घटनाक्रम घडून देखील दुसऱ्या दिवशी मंगलदास बांदल यांनी एका यात्रेमध्ये हजेरी लावत नेहमीच्या शैलीमध्ये भाषण केल्याने बांदल आता मैदानात उतरले असून पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगलदास बांदल कोणता झेंडा घेणार हाती…

मंगलदास बांदल कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणहून निवडणूक लढवून जिंकू शकतात अशी बांदल यांची ख्याती आहे, यापूर्वी त्यांनी काही निवडणुका अपक्ष लढवून त्या जिंकत मोठा इतिहास देखील घडवला आहे. बांदल कारागृहात जाण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादी तून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून आता नव्याने मैदानात उतरल्याने मंगलदास बांदल कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, अशी चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे.