शिरुर तालुक्यातील युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या शिरूर तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर व युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या प्रमुख पार पडली असून यावेळी युवा सेना शिरुर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

 

शिरुर तालुका युवा सेना कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असताना सर्व पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत सन्मान करण्यात आला आहे. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणी मध्ये युवासेना पुणे जिल्हा चिटणीस वैभव बाळासाहेब ढोकले, युवासेना शिरूर तालुकाप्रमुख विष्णू रखमाजी वाळके, युवासेना सोशल मीडिया शिरूर तालुकाप्रमुख मोहन भूषण घोलप, युवासेना उपतालुकाप्रमुख – मारुती बाळासाहेब फरगडे ( निमोणे जिल्हा परिषद गट ), सोमनाथ दत्तात्रय नवले ( कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गट ), अक्षय विठ्ठल फराटे इनामदार ( वडगाव रसाई मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट ), सागर अरुण टेमगिरे ( न्हावरे निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद गट ), अमोल कैलास पोकळे ( टाकळी हाजी कवठे येमाई जिल्हा परिषद गट ), युवासेना शिरूर शहरप्रमुख – आकाश अशोक ढाकणे, युवासेना रांजणगाव शहरप्रमुख – अक्षय संपत खेडकर अशा पद्धतीने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, दरम्यान यावेळी शिरुर तालुक्यातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात युवासेना शाखा स्थापन करून युवक व विद्यार्थ्यांचे संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.