रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 18 सप्टेंबर रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव, ता.शिरुर जि. पुणे) हे दोन तरुण उभे असुन त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी यांना सदरची माहीती सांगत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

 

त्यानुसार तपास पथकाने सापळा लावुन त्यांना ताब्यात घेउन त्यांची अंगझडती घेतली असता संकेत महामुनी याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांचा मित्र सुयश कोल्हे (रा. मोटेवाडी, निमोणे ता. शिरुर जि. पुणे) हा राहत असलेल्या कारेगाव येथील रुमवर तिन सिनेस्टाईल कोयते ठेवले असल्याची माहीती समोर आल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी जाउन तिन सिनेस्टाईल कोयते जप्त केले सुयश कोल्हे हा फरार असुन वरिल दोन्ही तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे. सध्या त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, वैजनाथ नागरगोजे, विलास आंबेकर, अमित चव्हाण, हेमंत ईनामे, पोलिस कॉन्स्टेबल प्रतिक खरबस, होमगार्ड शिंगाडे यांनी केली असुन सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.