शिरुर मध्ये संवादिनी तर्फे राबविण्यात येतोय अनोखा उप्रकम

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शिरुर मधील पालकांच्या तसेच मुलांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्यावर शिरुर येथील संवादिनीच्या गटाने अभ्यास करुन त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबत सविस्तर चर्चा करुन वेगवेगळे उपक्रम निवडले. त्यामध्ये शाळेतील मुलांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. आपली पुढची पिढी ही संसारक्षम बनावी. यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन “ओळख स्पर्श” तसेच “उमलत्या वयोगटाशी जुळवून घेताना” असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात येत आहेत.

 

शिरुर मधील वेगवेगळ्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनींसाठी “ओळखस्पर्श” हा उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे या मुलांना चांगला स्पर्श ,वाईट स्पर्श हे समजले. यामध्ये गोष्टी सांगून,चित्र दाखवून त्यांना समजून सांगण्यात आले. समाजात वावरताना “वाईट स्पर्श” करणाऱ्या व्यक्तींपासून स्वतः चे रक्षण कसे करायचे हे त्यांना समजले. शिरुर मधील विविध शाळेतील आत्तापर्यंत 2461 मुलांना “ओळख स्पर्श” हा उपक्रम राबवण्यात आला. यापुढेही हे काम चालू राहणार आहे.

तसेच इयत्ता आठवी ते दहावी या मुलांना समजून घेणे खूप कठीण आहे. त्यांचा यावेळी कोणतीही गोष्टी करताना संभ्रम निर्माण होतो. म्हणून त्यांच्यातील बदल, कसे वागले पाहिजे, यासाठी उमलत्या वयोगटाशी जुळवून घेताना हा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे अनेक मुलांमध्ये सकारात्मक बदल पहायला मिळत आहे. या पद्धतीने “शिरुर संवादिनी” टीम खूप चांगले काम करत आहे.

हे उपक्रम घेण्यासाठी डॉ स्मिता बोरा, डॉ सोनाली हारदे, डॉ मनिषा चोरे, डॉ शिल्पा घोडे, डॉ विद्या शिंदे, डॉ पुनम डफळ यांचा मोलाचा वाटा असुन रोहिणी जावळे, निता गायकवाड, उषा वाखारे, रुपाली खेडकर, मनीषा तरटे, राणी कर्डिले, निर्मला गाडीलकर यांचेही सहकार्य मिळत आहे.