रांजणगाव MIDC पोलिसांनी गांजा प्रकरणात केला काळाबाजार…

मुख्य बातम्या

पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध्य धंदयांना आलाय उत

शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करुन ट्रव्हल्सला सोडून देवून मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कर्मचारी गुटखा, ताडी, दारु, वेश्या व्यवसाय या अवैध्य धंदयाचे हप्ते गोळा करण्यात दंग असून अवैध धंदयाना जानुणबुजून पाठीशी घालण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

रांजणगाव पोलीस स्टेशन कंपन्याच्या अनेक गुन्हयांच्या बाबतीत मुस्कटदाबी करुन नागरीकांवर अन्याय करत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर जोरदार रंगत आहे. गंभीर गुन्हातील आरोपींना ते अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचे एका पीडीत महिलेने सांगितले आहे. अनेक कर्मचारी अवैध धंद्यांचे हप्ता गोळा करत असल्याचे पुरावे “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या हाती लागले असून त्यांची लवकरच पोल खोल करणार आहे.