अखेर शिरुरमध्ये शनिवारी आमदारांचा जनता दरबार

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक वर्षाहुन अधिक काळ विविध संकलनाची कामे रखडली होती. त्या अनुषंगाने राजकिय व्यक्तींनी पाठ फिरवली होती. त्यांचे कुठलेही नियंत्रण या कार्यालयावर नव्हते. त्यातच अॅड. आमदार अशोक पवार यांचे शिरूरपेक्षा वाघोलीकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांच्यावर होत होती.

शिरूरला प्रभारी तहसिल असल्याने व नागरीकांची कामे होत नसल्याने ते ३० जानेवारी रोजी उपोषण करणार होते. परंतू प्रभारी तहसिलदारांची बदली झाल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवण्याचे काम “शिरूर तालुका डॉट कॉम” ने केले आहे.

शिरूरला पुन्हा नव्याने प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी हे शिरूरला रुजू झाले असून ते प्रलंबित प्रकरणांची माहीती घेऊन प्रकरणे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करत आहे.

शनिवारी (दि. ४) रोजी आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जनता दरबार भरवणार असून यामध्ये भूमी अभिलेख, महावितरण, महसूल,पोलीस स्टेशन, पंचायत समिती आदी विभागाच्या समस्या निवारण करण्यासाठी तहसील कार्यालय, शिरूर येथे शनिवारी (दि. 4) रोजीसकाळी ११ ते दुपारी ३ वाजता नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जनता दरबारामध्ये खरच नागरीकांची किती कामे मार्गी लागतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

1 thought on “अखेर शिरुरमध्ये शनिवारी आमदारांचा जनता दरबार

  1. शिरूर तालुक्यातील तहसिलदार यांचेकडे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी 1 वर्षे पेक्षा अधिक काळ झाला आहे तरी अजूनही नाही झाली निमोणे पिंपळाची वाडी येथील केस

Comments are closed.