RANJANGAON

रांजणगाव येथील हॉटेल मोरया मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुख्य बातम्या

शिरुर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील हॉटेल मोरया गार्डन मधील रुम नं 204 मध्ये शिरीष बबनराव डोंगरे (वय 48) रा. 2449 /08 आशय, डेपो रोड, यशवंत कॉलनी, वैजापूर ता. वैजापूर जि. औरंगाबादया व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली असुन याबाबत अरिहंत श्रीकांत ऐतवाडे (वय 20) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 च्या दरम्यान शिरीष डोंगरे या व्यक्तीने 204 नं रुममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असुन आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सर्जिने करत आहेत.