महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी प्रमोल कुसेकर 

मुख्य बातम्या

“कार्याध्यक्ष” पदी तेजस फडके तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी किरण पिंगळे 

शिरुर: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रमोल कुसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर सचिवपदी सागर रोकडे यांची निवड करण्यात आली.

अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.

शनिवार दि. 24 डिसेम्बर रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष समीर राजे पठाण यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या शिरूर तालुक्यातील अनेक पत्रकार बांधवांनी हजेरी लावली. यावेळी सर्वानुमते शिरूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे पठाण यांनी उपस्थित पत्रकार बांधवाना पत्रकार महासंघाच्या ध्येयधोरणांविषयी अवगत केले तर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अरुणकुमार मोटे, कार्याध्यक्ष तेजस फडके यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे , आंबेगाव तालुका पत्रकार महासंघाच्या सचिव प्रमिला टेमगिरे, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य सचिन धुमाळ,अरुण कुमार मोटे,विजय थोरात,साहेबराव लोखंडे, देवकीनंदन शेटे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य विजय थोरात यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची शिरूर तालुका कार्यकारिणी

मुख्य समिती:

अध्यक्ष : प्रमोल कुसेकर

उपाध्यक्ष : प्रफुल्ल बोंबे

सचिव : सागर रोकडे

कार्याध्यक्ष :तेजस फडके

कोषाध्यक्ष: संपत कारकुड

संघटक : एकनाथ थोरात

सहसचिव: आदिनाथ रोकडे

सहसंघटक : निलेश जगताप

समन्वयक: धनंजय साळवे

संपर्क प्रमुख : शकील मणियार

कार्यकारी समिती

अध्यक्ष : किरण पिंगळे

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ हा राज्यातील तंत्रस्नेही आणि सजग पत्रकारांचा सर्वात मोठा संघ असून, राज्यभरात तब्बल 8400 हुन अधिक पत्रकार बांधव या पत्रकार महासंघाचे सदस्य आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार बांधवांचे गोठे योगदान असून शासनाने पत्रकार बांधवांच्या अधिस्वीकृती, निवृत्तिवेतन, विमा, अपघातविमा, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आदीकडे’ गांभीर्याने लक्ष द्यावे.

राज्याध्यक्ष- डॉ. समीर राजे पठाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

पत्रकारांच्या अडीअडचणी समजावून घेत त्यांना मोफत आरोग्य सेवेचे कवच व इतर सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असून तालुक्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम करणार आहे.कार्यकारिणीचा प्रत्येक सदस्य माझ्या परिवारातील सदस्य आहे असं समजून मी कार्य करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन.

प्रमोल कुसेकर ,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ,शिरूर तालुका