शिक्रापूरातून गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो जप्त

मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार दिवसांपूर्वी गोमांस घेऊन जाणारी तीन वाहने गोरक्षक व पोलिसांनी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर येथून दिड हजार किलो गोमांस घेऊन जाणारा टेंपो जप्त करण्यात गोरक्षक व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून गोमांस वाहतूक करणाऱ्या सुपियन इद्रीस कुरेशी व अदनान पैरोज कुरेशी या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून पुणे येथे गोमांस घेऊन एक टेम्पो जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली त्यांनतर शिवशंकर स्वामी, पोलीस शिपाई पवन जाधव, गोरक्षक मनोज मिसर, अभिषेक कडुसकर, कृष्णा सातपुते, प्रकाश कदम, हर्षद पाखरे, गणेश शिंदे, रुपेश सपकाळ, सर्पमित्र शेरखान शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक रोहिदास पाखरे, भास्कर बुधवंत हे सर्वजण शिक्रापूर येथे थांबले असता. त्यांना एम एच १६ ए एच १३३७ हा आयशर टेम्पो आलेला दिसला. त्यावेळी उपस्थित गोरक्षक व पोलिसांनी वाहन चालकांना अडवून पाहणी केली असता. त्यामध्ये गाय, बैलांचे कापलेली मुंडके, पाय व इतर शरीर मिळून आले. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर चे गोमांस हे अहमदनगर जिल्ह्यातून पुणे येथे देण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले, यावेळी पोलिसांनी सदर वाहन आणि तब्बल दिड हजार किलो गोमांस असा पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) रा. आनंदनगर सिंहगड पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या सुपियन इद्रीस कुरेशी (वय २५) आणि अदनान पैरोज कुरेशी (वय १९) दोघे रा. रा. झेंडी गेट जिल्हा परिषद शाळेजवळ अहमदनगर जि. अहमदनगर या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहे.

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष…
अहमदनगर जिल्ह्यात दररोज गोवंश कत्तल करण्याचे प्रकार घडत असताना प्रशासन दखल घेत नसल्याने दररोज हजारो किलो गोमांस विक्रीसाठी जात असल्याने प्रशासनाने यावर ठोस कारवाई करण्याची मागणी गोरक्षक करत आहे.