पोलिसांची आरोग्य तपासणी गरजेची; प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांची वैद्यकीय तपासणी संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस कर्मचारी रात्रदिवस नागरिकांच्या सेवेसाठी व रक्षणासाठी झटत असताना अनेकदा त्यांच्याकडून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे मत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या पुढाकाराने माऊलीनाथ मल्टीस्पेशालिटस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर बोलत होते तर याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश थोरात, डॉ. हेमंत दातखीळे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी कल्याण भांडवलकर, सतीश सरोदे, अमर गर्जे, निशांत तेलमोरे, सुप्रिया जाधव, दिनेश धनवटे, राघिनी चौधरी, प्रतीक्षा साकोरे, सुप्रिया आगरकर, रुपाली डफळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या शिबिरात तब्बल पन्नास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची दहा प्रकारच्या रक्त विषयक तपासण्या, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण यांसह आदी तपासण्या करत आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान यावेळी बोलताना पोलिसांसाठी माऊलीनाथ मल्टीस्पेशालिट हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर गर्जे यांनी केले तर डॉ. अजिंक्य तापकीर यांनी आभार मानले.