शिरुरमधून पोलिसाच्या हाताला झटका देवून बेडीसह आरोपी फरार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूरच्या लॉकअप मधील आरोपी पळून जाण्याची घटना काही महिन्यांपुर्वी घडली असताना पुन्हा शिक्रापूर येथील आरोपी शिरूर पोलिस स्टेशन च्या आवारातून पोलिसाच्या हातावर तूरी देवून बेडी सह फरार झाला आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी धनराज मधुकर डोंगरे यास अटक करुन शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस कस्टडीसाठी पोलिस अंमलदार भालेराव यांनी सरकारी सुमो गाडीतून आणत असताना शिरुर पोलिस स्टेशन येथे गाडी आली असता गाडीतून खाली उतरताना आरोपीने पोलिसाच्या हाताला (दि. २४) मार्च रोजी ९: 3० च्या सुमारास झटका देवून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा रात्रभर शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पळून गेल्याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २४) मार्च रोजी रात्री १० : १० वाजण्याच्या सुमारास पोलिस कॉन्स्टेबल उद्धव भालेराव व होमगार्ड पुंडे असे शिक्रापुर पोलिस स्टेशनचे च डि.ओ. संतोष शिंदे यांचे तोंडी आदेशाने शिक्रापुर पोलिस स्टेशन गु.रजि.नं.283/2023 भा.दं.वि.354 (सी)(डी),504, 506 मधील आरोपी धनराज मधुकर डोंगरे, (वय 28) रा.सध्या मलठण फाटा, शिक्रापुर, (ता. शिरूर), मुळ रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड याची पोलिस भालेराव व स्टाफ ग्रामीण रुग्णालय शिक्रापुर येथून वैद्यकीय तपासणी करून घेवून त्यास शिरूर पोलिस स्टेशन येथील लॉकपमध्ये जमा करण्यासाठी सरकारी सुमो वाहन. MH-12 RR-0469 यामधुन शिक्रापुर पोलिस स्टेशन येथून आरोपीस घेवून शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात येवून सरकारी वाहनाच्या खाली उतरून आरोपी धनराज याला उजव्या हातातील बेडीची एक बाजुनी धरुन त्यास गाडीतून खाली उतरविले असताना त्याने हिसका मारून पोलीस अटक वाचविण्याचे उद्देशाने पोलिसाच्या कायदेशीर रखवालीतून त्याच्या हातातील शासकीय बेडीसह पळून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस पनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.