शिरूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला…

क्राईम

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील शेतकरी दादाभाऊ विठ्ठल बरकले व त्यांचा भाऊ पांडुरंग विठठल बरकले यांचा चांडोह येथिल घोडनदी पात्राशेजारील शेत जमीन गट क्रमांक ४१ मधील साडेतीन एकर ऊस वीज वाहकतारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह गावात घोडनदी पात्रालगत शेतजमीन गट नं क्र ४१मध्ये दादाभाऊ विठ्ठल बरकले व त्यांचा भाउ पांडुरंग विठठल बरकले अशी दोघांची मिळून ३. ८ एकर शेतजमीन असुन त्यात दोघांनी उसाची लागवड केली होती. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास ३ एकर, ३० गुठे उस रानातील लाइटचे पोलवरील तारांचा शाँटसर्कीट झाला असल्याने जळून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत हे करत आहेत.

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!