आमदार अशोक पवारांना एकाच वेळी 500 हितचिंतकांच्या अनोख्या शुभेच्छा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला असून सणसवाडी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावत एकाच वेळी तब्बल 500 पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांच्या निवासस्थानी जात अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सणसवाडी (ता. शिरुर) गावाने आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गावातून इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित येणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची अनोखे उदाहरण दाखवून दिले असून आमदार पवार यांच्या प्रेमाविषयी गावचे कृतियुकत उदाहरण समोर ठेवले आहे.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, शशिकला सातपुते, ललिता दरेकर, सुनिता दरेकर, उद्योजक हरिष येवले, रामदास दरेकर, नवनाथ हरगुडे, संजय भंडारे, डॉ. पवन सोनवणे, डॉ. अजिंक्य तापकीर, माजी उपसरपंच संभाजी साठे, चेअरमन सुहास दरेकर, सावता माळी परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन बबुशा दरेकर, गोरख दरेकर, रमण दरेकर, रामभाऊ दरेकर, मच्छिंद्र दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर निलेश दरेकर, विष्णू हरगुडे, विठ्ठल दरेकर यांसह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

राजकारणातून समाजाचे हित साधायचे, सर्व समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावायचा, विकास दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे आणि भविष्याचा अचूक वेध घेत नागरिकांना सोयीसुविधा पुरवत त्यांची कुटुंबातील घटकासारखी काळजी घेण्यासाठी आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांनी सातत्याने केल्याने जनता त्यांच्याविषयी प्रेम, आपुलकी व जिव्हाळा जपत असते याचे एक उदाहरण म्हणजे सणसवाडी या गावाची एकी आणि आमदार पवार यांच्या वाढदिवशी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्र येऊन अनोखी एकी व आमदार पवार यांच्याविषयी असणारे प्रेम त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अशोक पवार यांना मंत्री पदासाठी आगळ्यावेगळ्या शुभेच्छा…

सणसवाडिया (ता. शिरुर) गावाने अशोक पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने मनमोहक पुष्पगुच्छ व महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय, मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या तसेच आमदार पवार यांचा फोटो असलेला अनोखा केक आणला. त्यामुळे सदर केक सर्वांच्या नजरेत भरला गेला. दरम्यान सणसवाडी करांनी आमदार अशोक पवार यांना मंत्री पदासाठी या शुभेच्छा असल्याचे जाहीर केले.