शिरुर तहसिल कार्यालयाच्या प्रभारी तहसिलदारपदी प्रशांत पिसाळ

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांची भ्रष्टाचाराबाबत अनेक लेखी पुराव्यानिशी तक्रारी झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली होती.

त्यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागेवर रंजना उंबरहंडे यांनी प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार घेतला होता. त्यांच्या काळात चार्ज घेतल्यापासून आजपर्यंत गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी फाईल्स अशा विविध प्रकारच्या संकलनाची कामे अनेक दिवसापासून निकालावर ठेवून सुद्धा प्रलंबित आहे. त्यांच्या विषयीही नागरीकांनी अनेक लेखी तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्या होत्या. याबाबत “शिरूर तालुका डॉट कॉमने” वेळोवेळी आवाज उठवला होता. अखेर त्या रजेवर गेल्याने प्रभारी तहसिलदार म्हणुण प्रशांत पिसाळ यांनी पदभार स्विकारला आहे. नागरीकांनी त्यांची भेट घेत समस्या मांडल्याने तातडीने नागरीकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

चुकीच्या व भ्रष्ट आधिकारी यांच्यामुळे शिरुर तहसिल कार्यालय बदनाम झाल्याने तहसिल कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी वरीष्ठ आधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.