शिरुर तालुका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समुपदेशकपदी राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुका हा लोकसंख्येने मोठा तालुका असुन तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी समुपदेशक म्हणून राणी कर्डीले यांची निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   राणी कर्डीले या गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कामात अग्रेसर असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या दक्षता कमिटीच्या अध्यक्षा म्हणुन काम […]

अधिक वाचा..

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांची “शिक्षणतज्ञ” म्हणुन निवड करण्यात आली. राणी कर्डीले या उच्चशिक्षित असुन त्यांचे शिक्षण BA Ded, BPED, MSW पर्यंत झालेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्या रामलिंग महीला उन्नती […]

अधिक वाचा..

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री?

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात दाखल याचिकेवर मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले होते. या निकालात न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीत समावेश असेल, असेही जाहीर केले होते. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली […]

अधिक वाचा..

कृषी पर्यवेक्षक परीक्षेत अरुण जोरी राज्यात प्रथम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे. घेण्यात आलेल्या या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि. ३) एप्रिल […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते त्यांना हि पदोन्नती देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सुहास रोकडे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, माणिक काळकुटे, माऊली शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. मुस्ताक शेख यांनी […]

अधिक वाचा..

भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

मुंबई: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३वा नंबर लागतो. तरुणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक […]

अधिक वाचा..

ग्रंथालय संघ शिरुर तालुकाध्यक्ष पदी विवेकानंद फंड

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी विवेकानंद फंड यांची सन 2023 ते 2026 या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची बिनविरोध निवडणूक शिक्षक भवन येथे नुकतीच पार पडली यावेळी सर्वानुमते रांजणगाव गणपती (ता. शिरुर)येथील विवेकानंद फंड यांना तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली. मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिडा विभागाच्या वतीने बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथील श्रावणी वाळकेची नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आसानसोल (पश्चिम बंगाल) येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या जी व्ही माळवनकर शूटिंग चॅम्पमियनशिप स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्रावणी संतोष वाळके हिने दहा मीटर पिपसाईड एअर रायफल या प्रकारात 400 पैकी 372 गुणांची कमाई केली असुन या कामगिरीमुळे तिची 1 ते 9 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे […]

अधिक वाचा..