कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असणारे ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि १२) रोजी पहाटेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असुन श्रीहरी निवृत्ती खोल्लम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जुन रोजी सकाळी ६ वाजता दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या हर्षल प्रविण पाटील यांनी तुमच्या दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर तुटले असुन चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त केल्याने दुकानावरती जाऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसुन आले.
त्यामुळे तातडीने पोलीसांना कळवताच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलिस उपनिरीक्षक निळंकंठ तिडके, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी पाहणी करुन अज्ञात चोरट्या विरुद्ध १६ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याबद्दल रांजणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे हे करीत आहेत.
प्रथमदर्शनी ५० किलो चांदीचे व ८० ग्रॅम सोन्याचे दागिने असा जवळपास ५० लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे. मी दुकानातील सर्व दागिन्यांची तपासणी केल्यानंतरच एकूण किती मुद्देमाल चोरीस गेला याची खात्री होईल.
श्रीहरी खोल्लम (अथर्व ज्वेलर्स)
रांजणगाव गणपती
रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव
कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कारेगाव येथील मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ने सन्मान