ग्रामीण भागातुन अनेक अधिकारी तयार व्हावेत: रमेश धूमाळ

शिरूर तालुका

शिक्रापूर: शालेय जीवनात जिद्द ठेवून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळत असून ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन यश मिळवावे व ग्रामीण भागातून अनेक अधिकारी तयार व्हावेत, अशी भावना अतिरिक्त विशेष पोलीस महानिरीक्षक रमेश धूमाळ यांनी व्यक्त केली.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश धुमाळ बोलत होते, यावेळी आयकर अधिकारी नंदकुमार पलांडे, प्राचार्य बी. आर. खेडकर, मनोज राउत, सुभाष लष्करे, हनुमंत बरडे, मनोहर ठाकरे, विभावरी देशपांडे, निशा रिक्षीत, सचिन शिंदे, प्रियंका पवार, नवनाथ कदम, विश्वास पऱ्हाड, कैलास मासळकर, प्रशांत पलांडे, प्रदिप धूमाळ, गणेश भुजबळ, सुधाकर मंचरकर, मधूकर साकोरे, विशाल पलांडे यांसह आदि पदाधिकारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान आयकर अधिकारी नंदकुमार पलांडे यांनी देखील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. रमेश धुमाळ यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आपण अधिकारी पदापर्यंत आपण कसे पोहचलो आणि त्यासाठी केलेले अभ्यासाचे नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच आमच्या गावातून अनेक अधिकारी घडले असल्याने पिंपळे धुमाळ हे गाव सध्या अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात असल्याचा मला अभिमान असल्याचे अतिरिक्त विशेष पोलीस महानिरीक्षक रमेश धूमाळ यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष लष्करे यांनी केले तर मनोज राउत यांनी आभार मानले.